ताज्या घडामोडी

मुकेश चुडासमा यांची मानवता संयुक्त संघच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी निवड

Spread the love

चिंचवड : भारत सरकारच्या नियम व अधिनियमानुसार कार्यरत असणार्‍या मानवता संयुक्त संघच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी आकुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते मुकेश चुडासमा यांच्या निवडीचे पत्र संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलकुमार वाजा, प्रशांत जोशी यांच्याहस्ते मोशी येथील एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष जतीन परमार, महासचिव जितेंद्र पटेल, उपाध्यक्ष कृष्णा यादव, खजिनदार श्रीमती अंकिता परमार, सचिव नितीन पटेल, ब्रजनंदन राय, जितेंद्र अगरवाल, सल्लागार निलेश घोडेकर आदी उपस्थित होते.


मुकेश चुडासमा गेली 30 वर्षे पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध संस्थावर कार्यरत असून अनेक लोकोपयोगी उपक्रमात ते सतत सक्रिय आहे. निवडी प्रसंगी मुकेश चुडासमा म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदाच्या वतीने वंचितांना शिक्षण, सामाजिक, भ्रष्टाचार, शोषण आदी क्षेत्रात भरीव कार्य करून पिडीतांना न्याय देण्यासाठी लवकरच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी शहरात दौरा करून मानवता संयुक्त संघाच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी संस्थेच्या शाखा उघडणार असल्याचे यावेळी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!