ताज्या घडामोडी

रोटरी क्लब व फ्रेंड्स ऑफ नेचर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी भागात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Spread the love

तळेगाव : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी व फ्रेंड्स ऑफ नेचर यांच्या संयुक्त विद्यमाने करंजगाव ऊंबरवाडी या आदिवासी भागांमध्ये जाऊन कपडे, शैक्षणिक साहित्य, चपला-बूट इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. करंजगाव तसेच ऊंबरवाडी या आदिवासी भागाकडे 90 कुटुंबांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.

व्यसनांच्या आहारी न जाता शिक्षणाला महत्त्व दिले गेले पाहिजे असे मत करंजगाव व ऊंबरवाडी येथील आदिवासी वस्ती मध्ये कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी फ्रेंड्स ऑफ नेचर या संस्थेचे माजी अध्यक्ष केशव रामायणे व सुधाकर मोरे तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी.च्या अध्यक्षा सुमती निलवे, उपाध्यक्ष विल्सेंट सालेर,सचिव  प्रवीण भोसले, सचिन कोळवणकर,  सुनील खोल्लम ,रवी दंडगव्हाळ प्रकल्प प्रमुख  राहुल खळदे,मिलिंद शेलार इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी बाजीराव सुपे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!