ताज्या घडामोडी

किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त सहकार्‍यांकडून गरजूंना अन्नधान्य वाटप

Spread the love

तळेगाव : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांचा वाढदिवस अनाथ आश्रमामध्ये धान्य व गरजूंना अन्नदान करून विविध ठिकाणी साजरा करण्यात आला.

लॉकडाऊन काळात रुग्णांचे नातेवाईक, कामगार, मजूर वर्ग व गरीब जनतेची होणारी उपासमार लक्षात घेऊन किशोर आवारे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या आणि आजतागायत सुरू असलेल्या फक्त पाच रुपयात पोटभर जेवण देणा-या जनसेवा थाळीवर मोफत अन्नदान करण्यात आले.

तसेच उद्योजक संतोष शेळके, राहुल जाधव, अनिल पवार, सतीश ढेंबे यांच्या वतीने उद्योगधाम व इंद्रायणी सेवा समिती तळेगाव दाभाडे येथे तर गहुंजे गावातील कार्यकर्त्यांच्या वतीने माई बालभवन दिव्यांग व अनाथ आश्रम शिरगाव या ठिकाणी धान्यवाटप करण्यात आले.

तसेच दिवड गाव व पुसाणे येथे किशोर आवारे यांच्या वाढदिवसानिमित्त 19 नोव्हेंबर रोजी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी भव्य मोफत कोविड  लसीकरण मोहीमेचे आयोजन गावातील कार्यकर्त्याच्या वतीने करण्यात आले होते.

वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये यासाठी किशोर आवारे एकांतवासात वाढदिवस साजरा करत असले तरी त्यांच्याकडून जनसेवेची प्रयत्न घेतलेले त्यांचे सर्व सहकारी तालुक्यातील विविध गरजू संस्था व घटकांना अन्नधान्यरुपी मदत करून किशोर आवारे यांचा वाढदिवस साजरा करत असल्याचे उद्योजक संतोष शेळके यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!