ताज्या घडामोडी

पवन मावळातील भडवली गावात 50 जणांना जेवणातून विषबाधा

Spread the love

मावळ : तालुक्यातील पवनमावळ येथील भडवली गावात मंदिरात झालेल्या कार्यक्रमानंतर देण्यात आलेल्या काल्याच्या प्रसादातून सुमारे  50 ते 60 जणांना विषबाधा झाली आहे.

गावात भैरवनाथ मंदिरात काकड आरती सोहळ्याच्या समाप्ती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसादाचे सेवन केल्या नंतर गावातील ग्रामस्थांना उलट्या पोटदु:खी,मळमळ असे त्रास जाणवू लागले.

बाधित रुग्णांना तातडीने उपचारासाठी पवनानगर काले येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. काही रुग्णांना ग्रामीण रुग्णालय कान्हे, पिंपरी येथील वायसीएम व औंध येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!