ताज्या घडामोडी

तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांचा मनमानी कारभार

Spread the love

तळेगाव : तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभागात रोज सकाळी 10 ते 12:30 आणि संध्याकाळी 4 ते 5 ओपीडी असते. मात्र यावेळी तेथे डॉक्टर उपलब्ध नसतात. वयोवृद्ध रुग्णांना हेलपाटे मारावे लागतात.त्यामुळे रुग्णांचे हाल होत असून ही परिस्थिती रोजच असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे.

डॉक्टर आरोग्य केंद्रातील नवीन इमारतीत बसत असल्यामुळे रुग्णांना ओपीडी ते इमारत अशा वाऱ्या कराव्या लागतात. ओपीडी मध्ये केस पेपर काढल्यानंतर नवीन इमारतीत डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यायची व पुन्हा औषधांसाठी ओपीडी गाठायची अशी अवस्था रुग्णांची आहे. अनेकदा दुपारनंतर डॉक्टर केंद्रात उपलब्ध नसतात याची पुसटशी कल्पनाही पेशंटला दिली जात नाही. त्यामुळे 5 वाजेपर्यंत पेशंट ताटकळत केंद्रात बसून राहतात.

येथील निवासी डॉ. महालिंगे व डॉ गुट्टे यांच्यापैकी एक डॉक्टर तळेगाव येथे राहतात. तर दुसरे पुणे येथे वास्तव्यास आहे. त्यामुळे शवविच्छेदनासाठी येथे डॉक्टर उपलब्ध नसतात अशा तक्रारी पोलिस प्रशासनाकडून केल्ये जात आहेत. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना व पोलिसांना महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्यांसाठी देखील डॉक्टर येथे वेळेवर उपलब्ध नसतात.

 

यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी डॉ. गुट्टे यांच्याशी संपर्क साधला असता मी आत्ताच रुजू झालो आहे . माझ्याकडे कर्मचारी वर्ग कमी आहे अशी उत्तरे त्यांनी दिली. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांचा मनमानी कारभार सुरू असून रुग्णांचे हाल कधी कमी होणार? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!