धर्मवीर संभाजी पतसंस्थेला 55 लाख रुपये निव्वळ नफा; सभासदांना देणार 9 टक्के लाभांश
तळेगाव : धर्मवीर संभाजी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत पतसंस्थेला 55 लाख रुपये निव्वळ नफा झाला असून सभासदांना 9 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
संस्थेच्या 22 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोरोना महामारीच्या काळात संस्थेने केलेल्या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेतील कार्यरत सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
चालू आर्थिक वर्षात संस्थेकडे 13 कोटी 8 लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने 10 कोटी 60 हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तर संस्थेला 55 लाख 39 हजार एतका निव्वळ नफा झाला आहे. या मधून संस्थेच्या सभासदांना 9 टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे. वार्षिक लेखापरीक्षणात संस्थेला ‘अ’ वर्ग दर्जा मिळाला आहे.
या सभेत सर्वाधिक दैनिक बचत केल्याबद्दल दैनिक बचत प्रतिनिधी समाधान शिंदे, प्रवीण वडनेरे, शैलेश वहिले यांचा सन्मान करण्यात आला.
संचालक जितेंद्र बोत्रे यांनी सर्वांचे स्वागत केले. सचिव विनोद टकले यांनी अहवाल वाचन केले. तर खजिनदार संतोष परदेशी यांनी आभार मानले.
यावेळी संस्थेचे संस्थापक खंडूजी टकले, अध्यक्ष विजय शेटे, सचिव विनोद टकले, खजिनदार संतोष परदेशी, संचालक दत्तात्रय शिंदे, दत्तात्रय पिंजन,ॲड. तुकाराम काटे, जितेंद्र खळदे, किरण किल्लावाला, सुनीता शेंडे, कल्पना चव्हाण व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



