ताज्या घडामोडी

लोणावळा शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने तक्रार निवारण दिनाचे आयोजन

Spread the love

 

लोणावळा : येथील शहर व ग्रामीण पोलिस ठाणे यांच्या वतीने आज (30 सप्टेंबर) रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

शासनाच्या परिपत्रकात प्रमाणे आयोजित केलेल्या तक्रार निवारण दिनास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. या तक्रार निवारण दिनास पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, गेल्या दीड वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले नव्हते. तक्रार निवारण दिनामुळे पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी एकाच वेळी उपलब्ध होतात. त्यामुळे तक्रारदार, अर्जदार व गैरअर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेऊन दखलपात्र गुन्हा असल्यास दाखल केला जातो.तर अदखलपात्र गुन्हा असल्यास तडजोड शक्य असल्यास निर्णय घेणे सोपे होते. त्यामुळे तक्रार अर्जाची निर्गती लवकर होण्यास मदत होते.

तक्रार निवारण दिनास लोणावळ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!