ताज्या घडामोडी

बनावट नोटा बनविणारी आंतरराज्य टोळी निगडी पोलिसांकडून जेरबंद

३२ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

निगडी: बनावट नोटा बनवणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात निगडी पोलिसांना यश मिळाले आहे. या टोळीकडून ३२ लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचत, १८ दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांमधून सहा आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत .आरोपी गोरख दत्तात्रय पवार( निगडी), विठ्ठल गजानन शेवाळे (सातारा), जितेंद्र पाणिग्रही (वसई), रणजीत सिंग परमार (गुजरात), यांच्यासह मुख्य सूत्रधार जितेंद्रकुमार नटवरभाई पटेल व किरण कुमार कांतीलाल पटेल (दोन्ही रा. गुजरात) यांस अटक करण्यात आली.

या सहा आरोपींकडून दोन हजार व पाचशे रुपयांच्या एकूण ३३ लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत.पोलीस कमिशनर कृष्ण प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार किशोर पढेर, रमेश मावस्कर यांना मिळालेल्या माहितीनुसार निगडी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!