ताज्या घडामोडी

लिंबफाटा येथे अपघात होऊ नये यासाठी उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार – अरुण माने

Spread the love

तळेगाव : येथील लिंब फाट्यावर वारंवार अपघात घडत असतात. अपघात घडू नये यासाठी उपाययोजना करण्यात यावी यासाठी प्रशासनाला अनेक वेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरीही प्रशासन कुठलेही पाऊल उचलत नसल्याने गुरुवारी जन आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक अरुण माने यांनी सांगितले.

कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना दिलेल्या निवेदनानुसार तळेगाव दाभाडे येथील लिंब फाटा या ठिकाणी वारंवार लहान-मोठे अपघात होत असतात.या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांचा जीव गेला आहे. या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा. अन्यथा सिग्नल यंत्रणा बसवावी ,अथवा स्पीड ब्रेकर, सर्विस रोडला स्पीड ब्रेकर, मध्यभागी हायमॉट दिवा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे.

मागण्या मान्य न झाल्यास १५ जुलै रोजी उपोषणाच्या मार्गाने जन आंदोलन करण्यात येईल.असे या निवेदनात म्हटले आहे .जोपर्यंत कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!