लोणावळा: वाढदिवस साजरा करण्याकरिता आलेल्या दोघांचा लोणावळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.अक्षय गुरव (वय २५) व धीरेंद्र पाटील (वय २४) राहणार रुपीनगर निगडी अशी मयत युवकांचे नावे आहेत.
मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात सर्व जण आले होते. सिंहगड कॉलेज जवळील खाणीत पोहण्यासाठी उतरले असता अक्षय व धीरेंद्र पाण्यात बुडाले. याची माहिती मिळताच पोलीस, शिवदुर्ग रेस्क्यू पथकासह घटनास्थळी पोहोचले शिवदुर्ग पथकाने शोधकार्य करत दोन्ही मृतदेह शोधले.
कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही पर्यटक शहरात गर्दी करताना दिसतात. अतिउत्साही पर्यटक धोक्याच्या दरी, कड्यांवरून सेल्फी घेताना आढळतात.यामुळे पर्यटक आपला जीव धोक्यात घालत आहेत तसेच अपघातांना आमंत्रण देत आहेत.



