ताज्या घडामोडी

कोरोनविरोधातील लढाईत डॉक्टरांचा वाटा सिंहाचा – संजय भिसे

Spread the love

पिंपरी -चिंचवड :कोरोनाच्या या भीषण काळात डॉक्टरांनी दिवस-रात्र एक करत काम केलं. या संसर्गाला हरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था पणाला लागली होती. पण तरीही डॉक्टरांनी धीर न सोडता मोठ्या हिमतीने आपलं काम केलं. संसर्ग वेगाने फैलावत असतानाही डॉक्टरांनी आपल्या कुटुंबाचीही काळजी न करता दिवस रात्र फक्त रुग्णांच्या सेवेत घालवले. त्यांच्यामुळेच कोरोनविरोधातील ही लढाई आपण सक्षमपणे लढत आहोत, या शब्दांत उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे आणि अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी डॉक्टरांचे आभार व्यक्त केले.

डॉक्टर्स दिनानिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील सुमारे 100 डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. तसेच त्यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

याप्रसंगी बोलताना फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे म्हणाले की, राष्ट्रीय सेवेसाठी अथक परिश्रम घेत असलेल्या डॉक्टरांच्या अमूल्य योगदानाची ओळख पटविण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टर दिन साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून ज्यांनी आपल्या गरजेच्या वेळी निःस्वार्थपणे आपल्याला मदत केली आणि रूग्णाच्या आरोग्यासाठी अथक परिश्रम केले, अशा सर्व डॉक्टरांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा उपक्रम केला आहे.

सदैव दुसऱ्यांच्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी सदिच्छा फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!