ताज्या घडामोडी

मावळच्या कृष्णराव भेगडे स्कूलच्या ‘ शिवम रायची ‘ उडी विभागीय स्तरात दुसरी , राज्यस्तरीय साठी निवड.

तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित , कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचा इ. आठवीचा शिवम राय विभागीय स्तरातील स्पर्धेसाठी कालच पंढरपूरला रवाना झाला होता.

Spread the love

मावळच्या कृष्णराव भेगडे स्कूलच्या ‘ शिवम रायची ‘ उडी विभागीय स्तरात दुसरी , राज्यस्तरीय साठी निवड.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, २३ जानेवारी.

 

सोमवार , दि. 23 जानेवारी 2022. तळेगाव दाभाडे तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित , कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलचा इ. आठवीचा शिवम राय विभागीय स्तरातील स्पर्धेसाठी कालच पंढरपूरला रवाना झाला होता.

आज झालेल्या या स्पर्धेत विभागीय स्तरातून त्याने दुसरा क्रमांक पटकावला. पंढरपूर येथे सुरू असलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये या विद्यार्थ्याने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. या विद्यार्थ्यास त्यांचे क्रीडा शिक्षक.

गोरख सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्याचे संस्थेचे संस्थापक. चंद्रकांत काकडे, संस्थेचे अध्यक्ष. संदीप काकडे, शाळेच्या मुख्याध्यापिका. मीना अय्यर, इतर संस्थेचे मान्यवर, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे खूप खूप अभिनंदन केले. सर्वच स्तरातून त्याचे खूप कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!