ताज्या घडामोडी

पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली कामकाजाची माहिती.

चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली आज चिंचवड पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Spread the love
पोलीस स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली कामकाजाची माहिती.
आवाज न्यूज : गुलामअली भालदार,  चिंचवड प्रतिनिधी, ४ जानेवारी, २०२३.


चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रकाश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली आज चिंचवड पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री फत्तेचंद जैन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विभागाचे इयत्ता अकरावी शास्त्र शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

या कार्यक्रमादरम्यान चिंचवड पोलीस स्टेशन येथील अधिकारी पी.एस.आय. श्री पोटे तसेच पी.एस.आय. श्री मोरे यांनी चिंचवड पोलीस स्टेशन येथे कशा पद्धतीने कामकाज चालते याविषयी विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाच्या कामकाजाची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.


पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील स्वागत कक्षापासून सर्व विभागांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांना या दोन अधिकाऱ्यांनी दिली विद्यार्थी सर्व गोष्टी पाहून अत्यंत आनंदी दिसत होते यानंतर पोलीस प्रशासन कशा पद्धतीने कामकाज करते नागरिकांचा सहभाग कसा असावा नागरिक हे साध्या वेशातील पोलिस असतात त्यांनी पोलिसांना मदत कशा पद्धतीने करावी याविषयी खूप चांगले मार्गदर्शन अधिकाऱ्यांनी केले.

आदरणीय. कृष्णदेव खराडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या पोलीस निरीक्षक. प्रकाश जाधव यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज केले आणि भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनी पोलीस दलामध्ये कशा पद्धतीने सामील व्हावे याचे मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने केले आजच्या या कार्यक्रमासाठी चिंचवड पोलीस स्टेशनचे एल.आय.बी. चे सागर आढारी यांनी नियोजन केले चिंचवड पोलीस स्टेशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी श्री जैन विद्या प्रसारक मंडळाचे, सतीश भारती धनंजय कुलकर्णी आणि शांतता समितीचे सदस्य सुभाष मालुसरे उपस्थित होते. धनंजय कुलकर्णी यांनी पोलीस विभागाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या यानंतर सतीश भारती यांनी पोलीस विभाग व श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संस्था यांचे असलेले नाते तसेच वेळोवेळी होणारी मदत याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. अंततः उपस्थित विद्यार्थ्यांन पैकी एका विद्यार्थ्याने आज आम्हाला खूप चांगली माहिती मिळाली पोलीस विभागाच्या चाललेल्या कामकाजाची माहिती आमच्या ज्ञानात कशा पद्धतीने भर टाकणार आहे असे सांगून पोलिसांना त्यांनी सॅल्यूट केला, आणि कार्यक्रम समाप्त झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!