ताज्या घडामोडी

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचा अवॉर्ड नाईट सोहळा संपन्न

Spread the love

तळेगाव दाभाडे:रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचा अवॉर्ड नाईट सोहळा काल संध्याकाळी सुशिला मंगल कार्यालय येथे पार पडला.या सोहळ्यात रेश्मा फडतरे, सचिन शिंदे, अतुल पवार, शाहीन शेख, संजय मेहता, विलास काळोखे, सुरेश शेंडे, दिलीप पारेख, अविनाश नागरे, दीपक फल्ले या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

या कार्यक्रमासाठी विशेष योगेश किरवे, प्रीतम कोलावटे यांनी दिले. यासाठी त्यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी असिस्टंट गव्हर्नर गणेश कुदळे, डिस्ट्रिक गव्हर्नर पंकज शहा, मेंबरशिप डिरेक्टर शितल शहा, नगरसेवक संतोष दाभाडे व पास्ट प्रेसिडेंट सारंग माताडे यांच्यासह रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक फल्ले, आभार प्रदर्शन संतोष शेळके यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!