ताज्या घडामोडी

घरोघरी बाप्पा थाटामाटात विराजमान

Spread the love

लोणावळा : बुद्धीची देवता असणाऱ्या श्रीगणेशाचे घरोघरी थाटामाटात व उत्साहात आगमन झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. गणेशाला घरी आणण्यासाठी भाविकांची लगबग सुरू आहे.

शहरातील गणेश कला केंद्रात रात्रीपासूनच भक्तगणांची बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी रीघ लागली होती. ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या घोषात बाप्पा घरोघरी पोहोचले. आज विधिवत प्राणप्रतिष्ठापना करून गणेश भक्त आपल्या लाडक्या गणेशाला घरात विराजमान करतील.

सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.कोरोना निर्बंध असले तरी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. फेसबुक, व्हाट्सअप वरून भक्त गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आहेत. पुढील दहा दिवस भक्त गणेशाची मनोभावे पूजा करतील. ‘जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे’ अशी मनोमन प्रार्थना या वर्षी भक्तगण गणेशाकडे करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!