वाळंज विद्यालयाचे मुख्याध्यापक देवरे यांच्या मातोश्रीना राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार.
सचिव, हरीनाथ कांबळे सर यांनी मातोश्रीचीं निवड केली व चिंचवड पुणे येथे "राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार "प्रदान केला.
वाळंज विद्यालयाचे मुख्याध्यापक देवरे यांच्या मातोश्रीना राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार
आवाज न्यूज: काव्यमित्र चिंचवड पुणे संस्थेच्या वतीने राष्ट्रमाता माता जिजाऊ यांच्या स्मृतिदिन व राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त व जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोनू अनाजी वाळंज विद्यालय आंबवणे येथील मुख्याध्यापक भटू देवरे यांच्या मातोश्री कुसुमबाई गिरीधर देवरे यांना मा. डॉ पंडित विद्यासागर माजी कुलगुरू,
मा. जयश्रीताई घोडक महाविद्यालय नळदुर्ग,, भाऊसाहेब जंजिरे प्रसीद्ध उद्योजक,, अनंत कदम सर उदगीर,, डॉ हेमंत श्रीगिरे,,
या मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
काव्यमित्र संस्थेचे सर्वे सर्वा राजेंद्र सगर
संजय जगताप सर उपाध्यक्ष,
.हरीनाथ कांबळे सर
सचिव यांनी मातोश्रीचीं निवड केली व चिंचवड पुणे येथे “राष्ट्रीय आदर्श माता पुरस्कार “प्रदान केला.
नंदकुमार वाळंज संस्थापक अध्यक्ष कोराईगड शिक्षण संस्था संजय अडसूळ संस्थापक मावळ वार्ता फाऊंडेशन, वत्सलाताई वाळंज मा. आदर्श सरपंच,
विनय विद्वान्स, संस्था उपाध्यक्ष,
गणपत मेंगडे कोराईगड संस्था खजिनदार,
उल्हास मानकर, गणेश दळवी पो. पाटील,गणेश वाळंज,सचिन चव्हाण ,तसेच सर्व आंबवणेकर व सगे सोयरे यांचेकडून अभिनंदन केले असून पुरस्कार प्रदान करताना मा वसंत बोरसे, स्वप्नील ढगे, विलास देवरे,रविंद्र सोनवणे सर, सोपान कुंभार सर,राज इटेकर वंदना बोरसे , शालिनी देवरे,विद्याताई देवरे, प्रणव बोरसे,सौरभ भामरे, विहान ढगे आणि स्वतः देवरे सर उपस्थित होते.
आयोजक काव्यमित्र चे भटू देवरे व शालिनी देवरे यांनी आभार मानले.



