ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत बनावट खव्याच्या मिठाईची विक्री; आरोग्य धोक्यात!

अंबाजोगाई : सणासुदीच्या काळात नागरिकांना गोडवा देण्याऐवजी सर्रास बनावट मिठाई विक्रीला लागल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. शहरातील तसेच मोरेवाडी परिसरातील यशवंतराव चव्हाण चौकातील ‘स्वीट होम’ येथे विक्री होणाऱ्या पेढे, बर्फी यांसारख्या खवा युक्त पदार्थांमध्ये बनावट खवा व केमिकलयुक्त चांदी वर्क वापरले जात असल्याचे उघड झाले आहे. ग्राहकांच्या म्हणण्यानुसार या मिठाईला खरी चव व सुगंध नसून, ती खाताना रासायनिक पावडरसारखा गंध व ओठांवर रसायनयुक्त थर बसतो. त्याचबरोबर या मिठाईचे बॉक्स दुकानाच्या नावाने न देता बोगस नावाने विक्री होत असल्याचेही दिसून आले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे या मिठाईवर उत्पादन तारीख वा एक्सपायरी डेट नमूद केलेली नाही. त्यामुळे मिठाई कधी तयार झाली, किती दिवस टिकेल याचा अंदाज घेणे अशक्य झाले आहे. आरोग्य धोक्यात टाकून फक्त जास्त नफा मिळवण्यासाठी बनावट खवा वापरण्याचा प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. न्यायालय व महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. सध्या गणेशोत्सव व गौराईच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर मिठाई विक्री सुरू असताना या प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासनाने तातडीने स्वीट होमसह शहरातील सर्व मिठाई दुकाने तपासावीत, अशी मागणी होत आहे. नागरिकांचे आरोग्य व प्राण धोक्यात घालणाऱ्या या प्रकारावर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक ठरले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!