ताज्या घडामोडी

बालदिनाचे औचित्य साधून कार्ला येथे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

कै.संजय (आवानाना) हुलावळे प्रतिष्ठानचा उपक्रम

Spread the love

कार्ला : कार्ला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै. संजय (आवानाना) हुलावळे प्रतिष्ठानच्या वतीने  बालदिनाचे निमित्त साधत चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत ३० मुलांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.आस्था गणेश मोरे ,द्वितीय क्रमांक कु.पल्लवी बाबुराव शिंदे,तृतीय क्रमांक कु.संजना बरमा पवार,उत्तेजनार्थ कु.तनिष्का सुखदेव हुलावळे,कु.समीक्षा बाबुराव शिंदे यांनी बक्षीस पटकावले.स्पर्धेचे परीक्षण अनिल पटेकर(सर)यांनी केले.स्पर्धेतील सर्व मुलांना ग्रामपंचायत सदस्या वत्सला हुलावळे यांचा वतीने खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब हुलावळे,सेक्रेटरी वत्सला हुलावळे,सदस्य सतीश मोरे,भरत हुलावळे,विशाल हुलावळे,अक्षय हुलावळे,मोनिका हुलावळे,अक्षता हुलावळे,शिवानी पात्रा उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!