ताज्या घडामोडी
शिरूरमध्ये महाराष्ट्र बँकेवर दरोडा ; दोन कोटींच सोन आणि 30 लाखांची रोकड लंपास
शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात भरदिवसा महाराष्ट्र बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे. भरदिवसा टाकण्यात आलेल्या धाडसी दरोड्यामध्ये दोन कोटींचे सोने आणि तीस लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे.
काल दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून बँक लुटली. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.



