ताज्या घडामोडी
पुण्यात यंदा दिवाळी पहाट रंगणार ; कार्यक्रमाला सरकारची परवानगी
पुणे : गेली दोन वर्षे राज्य कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. राज्यात लॉकडाऊन मुळे सण व उत्सवांवर बंधने घालण्यात आली होती. आता बंधने शिथील झाल्याने पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे ही दिलासादायक बाब असून पुणेकरांच्या मागणीनुसार दिवाळी पहाट कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे असे पवार यांनी सांगितले.
कोरोना आटोक्यात आला असला तरी संकट अजून संपलेली नाही त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली असेल तरी काळजी घ्यावी अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी केल्या.



