ताज्या घडामोडी

चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांना मिळणार थांबा ; पासची सुविधाही होणार सुरू – खासदार श्रीरंग बारणे

Spread the love

चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड व कर्जत रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू होणार आहे. त्याचबरोबर पुणे-मुंबई-पुणे प्रवास करणार्‍या नागरिकांना मासिक,ञैमासिक पास मिळण्याची सुविधा पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

चिंचवड, कर्जत स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना पुन्हा थांबा देण्यात यावा यासाठी व पासची सुविधा सुरू करण्यासाठी खासदार बारणे यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. त्यानंतर दानवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्याचे बारणे यांनी सांगितले.

कोरोनामुळे चिंचवड, कर्जत रेल्वे स्थानकावर गाड्या थांबत नसल्याने नोकरीनिमित्त मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या स्थानकांवर गाड्या थांबवण्याची विनंती बारणे यांनी केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!