ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, वरिष्ठ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी , किशोर छबुराव भेगडे यांची निवड जाहीर.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून आगामी काळातील निवडणूकीत राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्यात महत्वाची  भुुुुुुमिका बजावणार.किशोर भेगडे

Spread the love

तळेगाव दाभाडे:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी ज्येष्ठ नगरसेवक किशोर छबुराव भेगडे यांची निवड करण्यात आली.

मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांची राष्ट्रवादी वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड जाहीर केली. राष्ट्रवादी मावळ तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या तळेगाव दाभाडे येथील कार्यालयात   राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते निवृत्ती उर्फ पुढारी दाभाडे यांच्या हस्ते किशोर भेगडे यांना निवडीचे पत्र दिले.

संचालक अंकुश आंबेकर, चंद्रकांत दाभाडे, बाबाजी गायकवाड बहसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वच्छ, सुंदर व आपले तळेगाव दाभाडे शहर करण्यासाठी विशेष प्रयत्न तसेच मजबूत संघटन असलेले किशोर भेगडे कार्यकर्ता    ते नेेेेता अशी वाटचाल करणारा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मजबूत असल्याने पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष पदी त्यांची निवडकरण्यात आली. किशोर भेगडे यांच्या निवडी बद्दल त्यांचा  सत्कार करण्यात आला.                                                   त्या प्रसंगी किशोर भेगडे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते  पर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घेउन आगामी काळातील       निवडणूकीत राष्ट्रवादीची सत्ता स्थापन होण्यासाठी अग्रेसर राहुुुन  महत्वाची  भुुुुुुमिका बजावणार.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!