आपला जिल्हाकृषीमहाराष्ट्र

*सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करणारे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाचा ओसाड परिसर फुला- फळांनी बहरणारे धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी*

Spread the love

धाराशिव- खाकी वर्दीतील तसेच धाराशिव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून सेंद्रिय शेतीची चळवळ उभी करणारे तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या व निवासस्थानाच्या ओसाड पडलेल्या परिसराला फुला- फळांनी बहरणारे धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे पोलीस खात्यातील आगळे- वेगळे अधिकारी. धाराशिव पोलीस अधीक्षक पदी अतुल कुलकर्णी यांना येऊन जेमतेम एक वर्ष झाले. या एक वर्षात त्यांनी शेतकऱ्यांत सेंद्रिय शेतीची चळवळ निर्माण करून शेतकऱ्यात पोलीस अधिकाऱ्यांचा आपलेपणा निर्माण केला व त्यांचा हा उपक्रम, चळवळ सर्वदूर पसरली. हे पाहण्यास AR  न्यूज चॅनलने प्रत्यक्ष पाहणी करून पोलीस खात्यातील अतुल कुलकर्णी यांची भेट घेतली. व हा आगळावेगळा अधिकारी दिसला म्हणून संपादक संमोहनतज्ञ डॉ. रवींद्र सोरटे व मराठवाडा प्रमुख सखाराम कुलकर्णी यांनी त्यांचा सत्कार केला.

सेंद्रिय शेती करा व यातून स्वतःचे आरोग्य, उत्पन्न तसेच जमिनीची प्रत वाढवा असे आवाहनच शेतकऱ्यांना अतुल कुलकर्णी यांनी केले. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करत भाज्या- फळांची लागवड करून चांगले उत्पादन काढण्यास सुरुवात केली . शैलजा नरवाडे मसला खुर्द तालुका तुळजापूर यांनी वीस गुंठ्यात फळांची लागवड करून उत्पन्न भरघोस वाढवले. या सेंद्रिय खतात उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना माल विकण्यासाठी रस्त्यावर न बसता धाराशिव मध्ये दुकान उपलब्ध करून दिले. तेथे भावही ठरलेला, कमी जास्त नाही. त्यामुळे ग्राहकात शेतकऱ्यांबद्दल विश्वास येऊन शेतकऱ्यांचा शेतातील फळ ,भाज्या ,धान्य विकण्यास सोयीस्कर होऊन मागणी येत आहे. सेंद्रिय शेती उपक्रमाला अतुल कुलकर्णी यांनी धडपड करून वेळ काढून शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेत व शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेती करण्याची आवड निर्माण केली. शेतकऱ्यांच्या सेंद्रिय शेतीच्या चळवळी बरोबरच धाराशिव चे पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस अधीक्षक निवासस्थानाचा ओसाड परिसर फार मोठ्या प्रमाणावर होता. या परिसरात सेंद्रिय खतात भाजीपाला व फळांची फुलांची लागवड करून ओसाड पडलेला परिसर फुला-फळांनी बहरून टाकला. निवासस्थानाच्या परिसरात डिझाईन मध्ये फुला फळांची लागवड केली .भूमिगत पाईपलाईन करून ठिबक बसवले व पाण्याचा अपव्य होणार नाही याकडेही लक्ष दिले .परिसराच्या कोपऱ्या कोपऱ्यात सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे पिंपळ, वड ,लिंब अशी झाडे लावली. त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधांच्या झाडांची लागवड पण केली.येथे नर्सरी असून विशेष म्हणजे साबुदाण्याची झाड पण आहेत. हे सर्व करत असताना जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखून ठेवली .या फुला फळांच्या झाडीमुळे परिसर निसर्गरम्य होऊन वेगवेगळे पक्षी सकाळी व सायंकाळी येतात व त्यांची चिव- चिव करण्याचा आवाज मनाला आनंद देऊन जातो. या बहरलेल्या व निसर्गरम्य झालेल्या परिसरामुळे कर्मचारी परिसरात फिरत फिरत आनंद घेतात. असा अधिकारी मागे कधी आला नाही व पुढे येईल की नाही हे सांगता येत नाही असे जिल्ह्यातील शेतकरी व कार्यालयीन कर्मचारी बोलून दाखवतात .त्याच बरोबर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा शेतकऱ्यांचा हितासाठी असलेला सेंद्रिय शेती चळवळीचा उपक्रम सर्व पोलीस अधीक्षकांनी राज्यात राबवावा अशी ही मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!