ताज्या घडामोडी

पुणे जिल्हा कॉंग्रेस ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षपदी समीर भालेकर

Spread the love

पुणे : पुणे जिल्हा कॉंग्रेस ओबीसी सेलच्या कार्याध्यक्षपदी समीर राजू भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री सुनील देशमुख,प्रभारी सोनल पटेल, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी भालेकर यांना नियुक्तीपत्र दिले.

भालेकर यांनी आजवर विविध सामाजिक आंदोलनात भाग घेतला आहे. तसेच विविध पदांवर ते कार्यरत होते.

यावेळी पुणे जिल्ह्यातील सुतार समाज समन्वयक विद्यानंद मानकर, विश्वकर्मा मंदिर अध्यक्ष भगवान श्राध्ये, युवा अध्यक्ष सुतार समाज सचिन सुरसे, पुणे शहर समन्वयक दीपक भिलारे, ग्रामपंचायत सदस्य शंकर गाडे, अक्षय गाडेकर, प्रदिप दाभाडे, संतोष भालेराव, गौरव भोसले, संकेत भालेकर, राहुल भोसले, कुणाल आगळे, प्रमोद दिवेकर, सुरेश हेमाडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!