ताज्या घडामोडी

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळत नसून सरकार चिघळवतय – प्रविण दरेकर

Spread the love

तळेगाव : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान तळेगाव दाभाडे आगारातील आंदोलकांची महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

यावेळी भाजप शहराध्यक्ष रवींद्र माने,माजी नगराध्यक्ष अँड. रवींद्र दाभाडे यांच्या समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपचा पाठिंबा व्यक्त करत दरेकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी मी एस. टी. कर्मचार्‍याचा मुलगा आहे असे सांगत कर्मचाऱ्यांच्या व्यथा मला माहित आहे असे ते म्हणाले. सरकारने आंदोलनकर्त्यांच्या समस्या सोडवाव्यात असेही दरेकर यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!