ताज्या घडामोडी

कार्ला येथे किल्ले स्पर्धा संपन्न;लहानांचा उस्फूर्त सहभाग

Spread the love

कार्ला: कै.संजय (आवानाना) हुलावळे प्रतिष्ठान स्थापना व दिपावलीनिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने कार्ला येथे किल्ले  स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत सहभागी होत बालगोपालांनी उत्कृष्ठ असे किल्ले बनविले.शालेय वयापासून  विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांची माहिती व्हावी.इतिहासाशी त्यांच नात घट्ट व्हावं या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब हुलावळे,वत्सला हुलावळे,मोनिका हुलावळे,सतिश मोरे,रमेश जाधव,मितीश हुलावळे,अक्षय हुलावळे,साहिल हुलावळे,उपस्थित होते.

किल्ले पाहणीसाठी पर्यवेक्षक बलकवडे सर, इंगुळकर सर यांचे सहकार्य लाभले.

किल्ले स्पर्धेतील विजेत्यांची नावे
1) प्रथम क्रमांक-जाधव पाटील परिवार (पद्मदुर्ग किल्ला)
2)द्वितीय क्रमांक-मोरया ग्रुप कार्ला
(प्रतापगड किल्ला)
3)तृतीय क्रमांक-आई एकविरा ग्रृप कार्ला (प्रतापगड किल्ला)
4)उत्तेजनार्थ-सुनिल पटेकर
(काल्पनिक किल्ला)
5)उत्तेजनार्थ-शिवशंकर तरूण मंडळ
(काल्पनिक किल्ला)

किल्ला स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सोमवार दिनांक 8 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता मारुती मंदीर कार्ला येथे होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!