ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार सेल पुणे जिल्हा संघटक पदी धनंजय देशमुख

Spread the love

हवेली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामगार सेलच्या पुणे जिल्हा संघटकपदी धनंजय देशमुख यांची निवड करण्यात आली .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामगार सेल कार्यकारणी मध्ये शिरूर हवेली मतदार संघाचे युवा कार्यकर्ते धनंजय देशमुख यांची कामगार सेलच्या संघटक पदी निवड करण्यात आली.

त्यांना निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कामगार सेल पुणे जिल्हा अध्यक्ष प्रविण बल्लाळ यांनी त्यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले . यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी आपल्या मनोगतात म्हटले कि,  पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्या पर्यत पोहचविण्यासाठी मी पूर्ण सहकार्य करेल. कामगार वर्गाच्या अन्याय अत्याचार संदर्भात आंदोलनाची भूमिका घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल .

त्यांच्या निवडी बदल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी आनंदोत्सव साजरा केला .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!