ताज्या घडामोडी

सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी निखिल भगत तर सहसचिवपदी अतुल पवार यांची निवड

Spread the love

तळेगाव दाभाडे: सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी नगरसेवक निखिल भगत तर सहसचिवपदी साप्ताहिक अंबरचे उपसंपादक अतुल पवार यांची एकमताने निवड करण्यात आली.

संस्थेच्या नुतन कार्यकारिणीची पहिली सभा शुक्रवार (दि. ३०) रोजी पार पडली. यावेळी वाचनालय संगणीकृत करणे, आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, स्पर्धा परीक्षांसाठी विशेष वर्ग सुरु करणे, वाचनालयाच्या आवारात बांधण्यात आलेल्या अद्यावत नूतन अभ्यासिकेचे दिवाळीत उद्घाटन करुन सर्वांसाठी खुली करणे, बालसंस्कार वर्ग सुरू करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.

तसेच वर्षभरात आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दि. १९ ऑक्टोबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक कलाकारांच्या सुमधुर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

यावेळी सेवाधाम ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, सचिव डॉ. वर्षा वाढोवकर, खजिनदार कैलास काळे, सल्लागार हरिश्चंद्र गडसिंग, सुरेश साखवळकर, हेमंत बेडेकर कार्यकारणी सदस्य मीनल कुलकर्णी, निखिल भगत, अमित बांदल, राजेश बारणे, ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!