ताज्या घडामोडी

दहिवली गावात 227 नागरिकांचे लसीकरण

Spread the love

कार्ला : एक पाऊल कोरोना मुक्त गावाकडे या मोहिमेअंतर्गत आज पंचायत समितीचे उपसभापती दत्ता शेवाळे यांच्या सहकार्यातून दहिवली गावात 227 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

उपसभापती शेवाळे यांच्या सहकार्यातून तसेच दहिवली पोलीस पाटील सागर येवले, युवा नेते जितु मावकर यांच्या प्रयत्नातून मोफत लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 227 नागरिकांना कोविशिल्डचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. कार्ला आरोग्य अधिकारी डॉ. भारती पोळ व त्यांच्या टीमने ही मोहीम पार पडली.

यावेळी सरपंच अर्चना देवकर, उपसरपंच काजल पडवळ, ग्रामपंचायत सदस्य वर्षा मावकर, शंकर बोरकर ,गणेश मावकर, संतोष मावकर, प्रतिक मावकर, शरद मावकर व ग्रुप ग्रामपंचायत वेहेरगाव – दहिवली ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!