ताज्या घडामोडी

जिल्हाधिकारी यांचा आदेशाने पुरातत्व अंतर्गत येत असलेले लोहगड किल्ला व कार्ला लेणी पर्यटकांना खुल्ली

Spread the love

कार्ला : बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षे नंतर अखेर आज जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या आदेशाने पुरातत्व अंतर्गत येत असलेले कार्ला लेणी,भाजे लेणी, लोहगड व विसापूर किल्ला पर्यटकांसाठी खुल्ले झाले. मागील वर्षी कोरोना जास्त वाढल्या नंतर शासन आदेशाने पर्यटकांना ही पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती.

त्यानंतर यावर्षी जानेवारी,फेब्रुवारी,मार्च या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला तेव्हा सुरूवातीच्या तीन महीने ही पर्यटन स्थळे पर्यटकांना खुल्ली करण्यात आली होती. पुन्हा मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने ही स्थळे बंद करण्यात आली होती. कोरोना संक्रमणा मुळे कार्ला लेणी,भाजे लेणी,लोहगड,विसापूर ही पर्यटन स्थळे पर्यटकांन साठी बंद करण्यात आली होती. कोरोना संक्रमण वाढु नये हा यामागे सरकारचा उद्देश होता.

परंतु अलीकडे कोरोना काहीसा आटोक्यात येत असल्याने तसेच अनेकांची रोजी रोटी या पर्यटन स्थळाला भेट देणाय्रा पर्यटकांन वर अवलंबून असल्याने छोट्या मोठ्या व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली होती. यामुळे सर्वच स्तरातून पर्यटन स्थळे खुल्ली करावी अशी मागणी होत होती. त्याचा विचार करूनच पर्यटन स्थळे खुल्ली करण्यात आल्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!