ताज्या घडामोडी

लायन्स क्लब इंटरनॅशनलच्या वतीने पोलीस बांधवांना आणि ग्रामसुरक्षा सेवकांना अन्नदान, चिक्की आणि पाणी वाटप

Spread the love

तळेगाव : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 D -2  झोन 1 च्या  चेअरमन लायन प्रमिला सुनिल वाळुंज यांच्यामार्फत गणेश विसर्जन बंदोबस्त करणाऱ्या 100 पोलीस बांधवांना आणि ग्रामसुरक्षा सेवकांना अन्नदान, चिक्की आणि पाणी वाटप करण्यात आले.

गणेशोत्सव दरम्यान बंदोबस्त करत असताना पोलिस बांधव ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता बंदोबस्त देत असतात. या वेळी त्यांचे जेवणाचे हाल होत असतात. ही समस्या लक्षात घेऊन लायन सुनील वाळुंज हे मातोश्री यांच्या स्मरणार्थ तळेगाव लायन्स क्लब च्या माध्यमातून गेली पाच वर्ष हा उपक्रम सातत्याने राबवत असतात. त्याप्रमाणे या वर्षी झोन एक तर्फे हा उपक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास प्रांतपाल  हेमंत नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून तर माजी प्रांतपाल दीपक भाई शहा आणि रिजन चेअरमन  राजश्री शहा यांची प्रमुख उपस्थित लाभली.तळेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी शहाजी पवार , डिस्ट्रिक्ट खजिनदार शरद पवार ,ग्लोबल सर्विस कॉर्डिनेटर  नरेश राठी लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष दीपक बाळसराफ, लायन्स क्लब ऑफ वडगावचे अध्यक्ष  दिलीप मुथा, लायन्स क्लब ऑफ कामशेतच्या अध्यक्ष  अंजली सहस्त्रबुद्धे, लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रीमोचे अध्यक्ष  सुधीर कदम,  आमीन वाडीवला , लिओ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट शुभम वाळुंज, लिओ क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष  सहिल जैन  ,लायन सदस्य, लिओ सदस्य  पोलिस बांधव आणि ग्रामीण सुरक्षा दलाचे जवान उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन राधेश्याम भंडारी यांनी केले. तर आभार झोन सेक्रेटरी  अंजली सहस्त्रबुद्धे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!