ताज्या घडामोडी

शांताई नगर फेज 2 लक्षदीप सोसायटी समोरील खराब रस्ता व बंद स्ट्रीटलाईटमुळे नागरिक त्रस्त

Spread the love

तळेगाव : हिंदमाता भुयारी मार्गालगत शांताईनगर फेज 2 लक्षदीप सोसायटीतील नागरिक पाण्याखाली गेलेला रस्ता आणि दीड वर्षांपासून बंद असलेल्या स्ट्रीटलाइटमुळे त्रस्त झाले आहेत.

हिंदमाता भुयारी मार्गलगतच्या ओढ्याच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी भूमिगत पाईपलाईन करताना खोदण्यात आलेला रस्ता पुन्हा दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे येथे माती खचून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचत आहे. या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथील रहिवाशांना घराबाहेर पडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या साचणाऱ्या पाण्यामुळे परिसरात रोगराई वाढली आहे. तसेच भुयारी पाईपलाईनचे काम करताना बंद झालेल्या स्ट्रीट लाईट गेली दीड वर्ष झाले तरी सुरु करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे रात्री येथे अंधाराचे साम्राज्य असते.

यासंदर्भात नगरपरिषदेत वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. साधे लेखी निवेदनही स्वीकारले जात नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे काम न झाल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!