कर्जत मतदारसंघांमध्ये उभारण्यात येत आहे भारतातील सर्वात उंचीचा ध्वज
दिनांक 12 सप्टेंबर रोजी आदरणीय आमदार रोहितदादा पवार यांच्या संकल्पनेतून भारतातील सर्वात उंची चा ध्वज एकतेचा प्रतीक म्हणून जामखेड कर्जत मतदारसंघांमध्ये उभारण्यात येत आहे. बारा हजार किलोमीटर, महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 37 दिवसांचा प्रवास प्रत्येक जिल्ह्यामध्ये धार्मिक स्थळावर ध्वजाचे पूजन करण्याकरिता ही यात्रा 9 सप्टेंबरला निघालेली आहे.
12 सप्टेंबरला श्री संत गजानन महाराज पावन भूमीमध्ये यात्रेचे आगमन झाले, यावेळी जिल्हाध्यक्ष अँड. नाझेरजी काझी साहेब यांनी यात्रेचे स्वागत केले,
श्री संत गजानन महाराज मंदिरा मध्ये आदरणीय हरिहरदादा गणेश पाटील यांनी श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने ध्वजाचे पूजन केले.
त्यानंतर शेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने श्री संत गजानन महाराज मंदिरा गेट समोर ध्वजाचे पूजन सौ. नंदाताई पाऊलझगडे, सौ. अलकाताई बांगर, वरखेड उपसरपंच सौ. चंद्रकला पंजाबराव शिरसाट, भाग्यश्री परमेश्वर हींगणे, रुपाली गोपाल कराळे, राधा बिलेवार, प्रतिभा पाकधूने, माय साहेबराव शिरसाट यांनी पूजन केले
यावेळी यात्रा घेऊन आलेल्या पाहुणे नानाराव गवळी, नितीन खामगळ, ऋषिकेश भोजनकर, संदीप शिंदे, रामदास दूतल, पंकज लोखंडे या मान्यवरांचे गजानन महाराजांची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन स्वागत अँड.नाझेर काझी साहेब, राजूभाऊ पाटील, विनोद भाऊ साळुंखे, शहाणे मामा, विश्वनाथ झाडोकार काका, सौ.पाऊलझगडे ताई, चेतन पुंडकर, मनोज शर्मा, दिनेशभाऊ साळुंके यांनी यात्रे सोबत आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.
तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राजूभाऊ भोगल, शहाणे मामा, विश्वनाथकाका झाडोकार, शेखरभाऊ बोंद्रे, अँड.वीरेंद्रभाऊ झाडोकार, राहुल देशुमुख उपस्थित होते व शेगाव शहरातील जिल्ह्याचे उपाध्यक्ष विनोदभाऊ साळुंखे,चेतन फुंडकर तालुकाध्यक्ष,मनोज शर्मा शहराध्यक्ष,देवलाल लांजुळकर, संजय पहुरकर, अँड गणेश पिसे, विजय भाऊ गानोरकर, राजुभाऊ ठाकूर, भूषण दाभाडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शैलेश पटोकर नगरसेवक, विनायक गवई, जमशेद भाई, गजानन हू, पंकज सोनवणे, अन्सार भाई, सरफराज भाई, गजानन भोंडेकर, मनोहर बावस्कर, राजूभाऊ आसोलकर, ज्ञानेश्वर ताकोटे, श्रीधर गायकवाड, मकरंद इंगळे, नरेंद्र भाकरे, संजय गव्हादे, अहमद भाई, संजय तारापुरे, भूषण ढगे, विकास ढगे, राजू कराळे, इब्राहीम खान, दत्ता भाऊ, संकेत जगताप मोहन भाऊ, चैतन्य गणोरकर, ज्ञानेश्वर गायकवाड सोशल मीडिया अध्यक्ष, विक्रांत भोंगळ पाटील, श्रीकांत शेळके गोपाल पाटील, जिया भाई, दिनेश भाऊ साळुंके तसेच शहरातील सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते



