ताज्या घडामोडी
तळेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी सतीष दिघे
तळेगाव : नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी जळगाव जिल्हा प्रशासन अधिकारी सतीष दिघे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी श्याम पोशेट्टी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर त्यांचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे मागील तीन महिने हे पद रिक्त होते. लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे प्रभारी म्हणून कामकाज पाहत होते.
तब्बल तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नगरपरिषदेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळाला आहे. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.




