स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची तालुकास्तरीय आढावा बैठक संपन्न
कामशेत: स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची तालुका स्तरीय आढावा बैठक कामशेत येथील निसर्ग धाबा येथे नुकतेच पार पडली.
या आढावा बैठकीत पक्षाचे पुणे जिल्हा युवक अध्यक्ष नितीन साळवे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व विविध महामंडळाच्या निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना नितीन साळवे यांनी पक्षांमध्ये सर्व जातीधर्माच्या कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाईल व पक्षातील निष्ठावंतांना यापुढील काळात न्याय दिला जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युवक अध्यक्ष नितीन साळवे, तालुका अध्यक्ष बबनराव ओव्हाळ, पुणे जिल्हा प्रवक्ते कोंडीबा रोकडे, उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, सरपंच रुपेश गायकवाड, जावेद शेख, बबनराव जाधव, निलेश गायकवाड, संदीप ओव्हाळ, विजय भवार, रवी भवार, शिवाजी ओव्हाळ, विजय साबळे, नरेंद्र ओव्हाळ, सुमित सोनवणे, भाऊ कदम यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



