ताज्या घडामोडी

तडीपार गुन्हेगारांना मिळणार स्मार्टफोन ; तपासात होणार मदत – पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची कल्पना

Spread the love

चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील तडीपार केलेल्या गुन्हेगारांना पोलिसांच्या वतीने स्मार्टफोन दिले जाणार आहेत. यामुळे गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. यासाठी त्यांचे लोकेशन तपासून व रोज एकदा संवाद साधून गुन्हेगार हद्दीत आहे का याची खातरजमा करावी असे आदेश पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिले आहेत.

आयुक्त कृष्णप्रकाश यांना पदभार स्वीकारून वर्षपूर्ती झाली आहे. यानिमित्ताने वाकड पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी ही नामी युक्ती कर्मचाऱ्यांना सांगितली.

तडीपार गुंड शहरात येऊन गुन्ह्यात सहभागी झाल्याचे प्रमाण वाढत आहे या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी ही शक्कल लढविली आहे. तडीपार गुन्हेगाराला स्मार्टफोन देऊन त्याच्यावर पाळत ठेवण्याच्या सूचना प्रत्येक पोलीस स्टेशनला देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!