लोणावळ्यातील गणेशमुर्ती विक्री स्टाॕलवर आकर्षक रंगाच्या गणपतीच्या मुर्ती विक्रीसाठी
लोणावळा : लोणावळ्यातील गणपतीच्या विक्रीसाठी शहरात विविध श्री गणेशमुर्ती कला केंद्रावर आकर्षक रंगाच्या श्रीच्या गणपतीच्या मुर्ती विक्रीसाठी उपलब्द झाल्या असून मुर्तींना बुकींग करण्यासाठी गर्दी होत आहे. गणरायाचे आगमनासाठी थोडेच दिवस शिल्लक असल्याने भांगरवाडी येथील श्री.समर्थ कला केंद्रात रंगकाम करण्यात कारागीर मग्न आहेत.
हारपुडे चाळ , कैलासनगर रोडला हारपुडे गणेशमुर्ती कला केंद्रावर मालक शुभम हारपुडे यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती , लालबागचा राजा , टिटवाळा , पेशवाई , बालाजी ,अष्ठविनायक , लंबोदर, बालगणेश प्रकारच्या गणेशमुर्ती विविधरंगामधे शाडुमातीच्या उपलब्ध करण्यात आल्या आहे.
शुभम विजय हारपुडे म्हणाले ,” सुमारे चार वर्षापासून या व्यवसायाला सुरूवात केली आहे.घरपोच श्रीच्या मुर्ती पोहोचविण्याचे व गणेशभक्तांना ञास होणार नाही , अशी आमची सर्विस या वर्षी राहणार आहे.या गणपती मुर्ती कला केंद्रावर एक ते दोन फूट उंच घरगुती गणेश मुर्ती आहे, तसेच तरूण मराठा मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपती मंडळाची गणेशमुर्ती सह दहा गणपती मंडळांच्या मुर्ती आमच्याकडे बुक झाल्या आहेत.इकोफ्रेंडली शाडूमाती व पी ओ पी च्या गणपती मुर्ती आर्डरप्रमाणे आम्ही मागवून देतो.गणपतीच्या मुकूटावर आकर्षक भरजरी फेटा , पितांबर , शालू , खडे ,ज्वेलरी मुर्तीला बसवून दिले जातात.अनेक गावातील गणेशभक्तांनी मुर्ती आधीच बुक करून ठेवल्या आहेत..
लोणावळा बाजारात गणपतीच्या सजावट व पूजेचे साहित्याची दुकाने सजली –
लोणावळा बाजारपेठेत हार , पाच फळे , सजावट करण्यचे साहित्य , मखर , रंग , मिठाई , मोदक आदी गौरी गणपती साठी लागणारे साहित्याची दुकाने सजलेली असून ग्राहकाकडून खरेदी साठी गर्दी होत असल्याचे दिसते.




