ताज्या घडामोडी

कामशेतमध्ये पोलिसांच्या वतीने तक्रार निवारण दिनाचे आयोजन

Spread the love

कामशेत : येथे पोलिसांच्या वतीने 9 सप्टेंबर रोजी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी सकाळी 10 वाजता कामशेत पोलीस ठाणे हद्दीमधील गणेश मंगल कार्यालयात तक्रार निवारणाचा उपक्रम घेण्यात येणार आहे.

यावेळी ज्या नागरिकांनी पोलीस महासंचालक कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय ,अप्पर पोलिस व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, सरकार व कामशेत पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केले आहेत. त्या सर्वांच्या तक्रारींचे निवारण यावेळी करण्यात येईल.

पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे. वरिष्ठ कार्यालयात तसेच पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आलेल्या तक्रारींबाबत तक्रारदारांना समक्ष बोलवण्यात आले असून यावेळी सर्व बीटचे अंमलदार व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या दिवशी नागरिकांच्या तक्रारींचे विनाविलंब निराकरण केले जाणार आहे. तसेच ज्या प्रकरणात कारवाई करण्याची गरज आहे तेथे तात्काळ कारवाई केली जाईल. अशी माहिती कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.

तक्रार निवारण दिनास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन जगताप यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!