ताज्या घडामोडी

कुसगाव बुद्रूक येथे महिलांसाठी केक बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर संपन्न

Spread the love

कुसगाव : मावळ भाजपा महिला आघाडीच्या वतीने कुसगाव बुद्रूक येथे केक बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच संपन्न झाले .भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे यांच्या वतीने व कुसगावच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड यांच्या नियोजनाखाली या केकचे प्रशिक्षण घेण्यात आले .

भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेब यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याकरिता नारी सबलीकरण व सक्षमीकरण करीता व ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे बोत्रे व गुंड यांनी सांगितले.

कार्यक्रमाला उपस्थित भाजपा महिला अध्यक्ष सायली बोत्रे ,नाणे मावळ अध्यक्षा सीमा आहेर, तालुका उपाध्यक्ष अश्विनी तिकोणे ,ज्ञानेश्वर गुंड, शक्ती केंद्र प्रमुख मधूकर कडू, बुथ अध्यक्ष मदन गाडे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा मधूकर कडू, फसीन मज्जिद शेख, राजू काटकर, भरत मोरे, किसन महादू गुंड पोलीस पाटील, मानकर मँडम मुख्याध्यापक, शेलार सर,प्रशिक्षक मोहिनी माने यांच्यासह कुसगाव येथिल महिला भगिनी मोठ्या संख्येने केक प्रशिक्षणाला उपस्थित होत्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!