पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकास अटक
कामशेत : पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कामशेत पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.
सागर नामदेव हनवते (वय 26) रा.कान्हे.ता.मावळ, जि.पुणे,मुळगाव (रा.रेडगाव),पो.जवळापांचा, ता.कमळनुरी,जि.हिंगोली असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबई – पुणे हायवे वरील नायगावच्या हद्दीत शिवराजे हॉटेल समोरील मोकळ्या आवारात आरोपी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत आरोपीस शिताफीने पकडले व ताब्यात घेतले.आरोपीची झडती घेतली असता एक गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस व मोबाईल असा एकूण 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणी कामशेत पोलीस अधिक तपास करीत आहेत.



