ताज्या घडामोडी

पिं.चिं. लाच प्रकरण! स्थायी समिती अध्यक्षांच्या जामिनावर आज सुनावणी

Spread the love

चिंचवड : महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष अँड. नितीन लांडगे यांच्या जामिनावर आज पुणे न्यायालयात सुनावणी होणार आहे.

लांडगे यांच्यासह मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, विजय चावरिया संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे, शिपाई अरविंद कामे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 18 ऑगस्ट रोजी अटक केली आहे.

सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर आणखी दोन दिवस कोठडीत वाढ करण्यात आली होती. तपासात आणखी 16 जणांना मिळालेली लाच वाटली जाते असा कबुलीनामा आरोपी पिंगळेने दिल्याची माहिती लाचलुचपत विभागाच्या वतीने कोर्टात देण्यात आली होती.

त्यामुळे या 16 जणांची नावे आज उघड होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!