ताज्या घडामोडी
तिकीट नाकारल्याचा थेट फटका; सचिन भैया देवकरांसह शेकडो कार्यकर्त्यांची भाजपमध्ये मोठी एंट्री!
अंबाजोगाई. भरारी न्युज. | परळी वेस येथील वार्ड क्रमांक पाचमध्ये मोठी राजकीय कलाटणी पाहायला मिळाली. सामाजिक कार्यकर्ते म्हणून परळी वेस परिसरात भक्कम ओळख निर्माण केलेले सचिन भैया देवकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट–शरद पवार गट) यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ते काम पाहत होते. मात्र, एकत्र झालेल्या राष्ट्रवादी गटाच्या वतीने माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्याकडे वार्ड ५ ची उमेदवारी देण्याची जबाबदारी असतानाही, आपल्या जवळच्या व विश्वासू मानल्या जाणाऱ्या सचिन देवकर यांनाच उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी बंड पुकारले. सचिन भैय्यांना तिकीट न देण्यामागे काही गद्दारांचे डावपेच असल्याचा आरोप करत समता नगर, भीम नगर व साठे नगर येथील शेकडो युवकांनी आता भाजपच्या बाजूने एकत्र येत नंदकिशोर मुंदडा यांना प्रचंड समर्थन जाहीर केले आहे. या युवकांचे भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आले. भाजप नेते नंदकिशोर मुंदडा यांनी बोलताना सांगितले की, आमदार निधीतून अंबाजोगाई शहरात नाल्या, रस्ते, पाणीपुरवठा, लाईट, सभागृहे अशा अनेक विकासकामांचा अमलबजावणी करण्यात आली नगरपालिका आमच्या हाती दिल्यास एकही नागरिक अडचणीत राहणार नाही,” अशी हमी त्यांनी दिली. याच विश्वासातून आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवत सचिन भैया देवकर व त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वार्ड क्रमांक पाचमधील लोकसंपर्क, सर्ववयोगटातील आपुलकी आणि जनमानसातील लोकप्रियतेमुळे “युवकांचे हृदयस्थान” म्हणून ओळख असलेल्या सचिन भैय्यांना उमेदवारी न दिल्याने साठे गटातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. परिणामी, “आता साठे नगर–समता नगर–भीम नगर येथे साठे साहेबांना कार्यकर्ते शोधावे लागतील की काय?” अशी चर्चा जनतेमध्ये रंगताना दिसत आहे. पृथ्वीराज साठे विधानसभेला उमेदवार असताना ज्या सचिन भैय्या देवकरांनी अहोरात्र परिश्रम घेतले, त्यांनाच पृथ्वीराज साठे यांनी तिकीट नाकारल्याने हा संतापाचा ज्वालामुखी फुटल्याचे बोलले जात आहे. स्थानिक नागरिकांचे मत स्पष्ट आहे — “सचिन भैय्यांना अन्याय केला, त्याची किंमत आता साठे साहेबांना नक्कीच मोजावी लागेल.”




