ताज्या घडामोडी

पगार थकला; कामगारांचा संताप — ‘प्रहार’ संघटनेचे भीक मागो आंदोलन. आंदोलनाच्या निधीतून CEO मॅडमला साडीचोळी बांगडी भेट. भेट घ्यायची नाही म्हणून मॅडमनी पळ काढला.

अंबाजोगाई (प्रतिनिधी): अंबाजोगाई नगर परिषदेमधील स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही, यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अशोक भाऊ घडले यांच्या नेतृत्वाखाली 21 ऑक्टोबर रोजी ‘भीक मागो आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनादरम्यान नागरिकांकडून सुमारे तीन ते साडेतीन हजार रुपयांचा निधी जमा झाला, जो नगर परिषदेच्या मुख्याधिकारी CEO टोंगे मॅडम यांना ‘दिवाळी भेट’ म्हणून साडी-चोळी खरेदी करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात सध्या या विषयाची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कामगारांनी आता कामबंद आंदोलन सुरू केले असून, “जोपर्यंत आमच्या खात्यात पगार जमा होत नाही, तोपर्यंत कोणताही कामगार कामावर हजर होणार नाही,” असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शहरातील विविध भागांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, शहरात नगरपालिकेची वाहने रात्रीच्या वेळी खाजगी कॉन्ट्रॅक्टरकडे कामाला जात असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आंबेडकर चौक परिसरात नगरपालिकेचा ट्रॅक्टर बोधीघाट परिसरातून मटेरियल वाहतूक करताना दिसल्याची चर्चा आहे. यामुळे CEO “मॅडमला नगर परिषदेचे ट्रॅक्टर खाजगी कामांसाठी देता येतात, पण कामगारांचा पगार का नाही?” असा सवाल नागरिक व कामगारवर्गातून उपस्थित केला जात आहे. याबाबत शहरात अनेक चर्चांना उधाण आले असून, मुख्याधिकारी टोंगे मॅडम कोणाच्या सांगण्यावरून निर्णय घेतात, तसेच कामगारांचे पेमेंट मुद्दाम थांबवले आहे का, या विषयांवरही टीकेची झोड उठली आहे. साफसफाई विभागातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी अशोक भाऊ गंडले यांच्याकडूनच आशा व्यक्त केली जात आहे, आणि शहरातील कामगारवर्ग त्यांच्याभोवती एकवटला आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!