ताज्या घडामोडी

“दिवाळीच्या उजेडात कामगारांचा अंधार — चार महिन्यांपासून पगार थांबले सिओ मॅडम व संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी,व प्रहारचं भिक मागो आंदोलन”

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन थकलेले असून, त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. दिवाळीच्या तोंडावरही पगार न मिळाल्याने अखेर प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अशोक भाऊ गंडले यांच्या नेतृत्वाखाली सफाई कर्मचाऱ्यांनी ‘भिक मागो आंदोलन’ करत संताप व्यक्त केला. हे आंदोलन नगरपरिषद कार्यालयापासून शहर पोलीस स्टेशनपर्यंत काढण्यात आले. मार्गात कर्मचाऱ्यांनी नागरिकांकडून प्रतीकात्मक भिक मागत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यावर कर्मचाऱ्यांनी सिओ मॅडम आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर फसवणुकीचा (कलम 420) गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पीआय जोगदंड यांनी सिओ मॅडम यांच्याशी संपर्क साधला असता, मॅडम यांनी “पेमेंट प्रक्रिया सुरू असून, शुक्रवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होईल,” असे सांगितल्याचे समजते. मात्र, प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटलं की, “दिवाळी सारखा सण येऊन ठेपला आहे. अधिकारी आणि स्वच्छता निरीक्षक स्वतःच्या घरात दिवाळी साजरी करतील, पण आमच्यासारख्या कामगारांना चार महिन्यांपासून पगार नाही. आम्ही दिवाळी साजरी करायची कशी?” सफाई कर्मचाऱ्यांनी पुढे सांगितले की, “सिओ मॅडम यांनी वेळेवर वेतन देण्यात पूर्णतः निष्काळजीपणा केला आहे. दिवाळीच्या आनंदाच्या काळात आमच्या घरात मात्र अंधार पसरला आहे.” आंदोलनानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात निवेदन देत संबंधित अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आता संपूर्ण कामगार वर्गाचे लक्ष लागले आहे की, सिओ मॅडम यांच्यावर कारवाई होते का, की अखेर कामगारांना दिवाळीपूर्वीच त्यांच्या खात्यात पगाराचा उजेड दिसतो. आता कामगारांचे करायचं लक्ष लागले आहे

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!