ताज्या घडामोडी

CEO मॅडम, रात्रीचे साडेअकरा वाजता, आपली नगर परिषदेची अधिकृत वाहनं, खासगी कॉन्ट्रॅक्टरच्या कामासाठी वापरली जातायत – आणि तुम्ही डोळे झाकून गप्प का?

"नगर परिषदेचं वाहन खासगी कॉन्ट्रॅक्टरच्या कामाला? – CEO मॅडम, हे बघा नीट!" 🗓 रात्रीचे 11:30 वाजलेत – पण वाहन सरकारी, काम खासगी! अंबाजोगाई नगर परिषद – एका सामान्य नागरीकाचा सवाल: CEO मॅडम, रात्रीचे साडेअकरा वाजता, आपली नगर परिषदेची अधिकृत वाहनं, खासगी कॉन्ट्रॅक्टरच्या कामासाठी वापरली जातायत – आणि तुम्ही डोळे झाकून गप्प का? 📍 धोबी घाट परिसर – आमदार निधीतून मंजूर समाजमंदिराचं काम सुरू आहे. पण... हे काम एका खासगी कॉन्ट्रॅक्टरकडे दिलेलं असून, नगर परिषदेचं ट्रॅक्टर त्या कामासाठी वापरण्यात येतंय. प्रश्न गंभीर आहेत: नगर परिषदेचं सरकारी वाहन, खासगी कामासाठी वापरण्याची परवानगी कोणी दिली? ट्रॅक्टरचे डिझेल खर्च आणि ड्रायव्हरचा पगार – हे कुणाच्या खर्चातून भरले जाणार? नगर परिषदेचे कर्मचारी आणि संसाधनं, एका खासगी ठेकेदाराच्या कामासाठी का वापरली जातायत? जर हे वाहन वापरण्याचं बिल तयार होणार असेल, तर ते नगर परिषदेच्या निधीतून का? काम रात्री 10 वाजता सुरू झालं आणि बारा वाजेपर्यंत सुरू होतं – हे सगळं सरकारी वाहन आणि सरकारी कर्मचारी वापरून! आमचा सवाल आहे CEO मॅडम आणि संबंधित अधिकाऱ्यांना: काय ही अकार्यक्षमता, की मुद्दाम केलेली ठेकेदारावर मेहरबानी? जेव्हा समाजमंदिराचं काम खासगी कंपनीला दिलं आहे, तेव्हा नगर परिषद कशासाठी तिची यंत्रणा वापरतेय? 👉 लोकशाहीत पारदर्शकता आवश्यक आहे. जनतेच्या पैशावर चालणारी यंत्रणा, खासगी हितसंबंधासाठी वापरली जातेय का? CEO मॅडम, आता डोळे उघडा – आणि उत्तर द्या! नगर परिषद, CEO, आणि संलग्न अधिकारी यांना या प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!