ताज्या घडामोडी

प्रा. नरेशकुमार जैस्वाल यांना पीएचडी पदवी प्राप्त

अंबाजोगाई : श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित फार्मसी कॉलेज, अंबाजोगाई येथील प्राध्यापक नरेशकुमार जैस्वाल यांनी मानसरोवर ग्लोबल युनिव्हर्सिटी, मध्य प्रदेश येथून फार्मास्युटिकल सायन्स या विषयात पीएचडी पदवी संपादन केली आहे. “एनहांसमेंट ऑफ सोल्युबिलिटी फॉर पुअरली सोल्युबल ड्रग्स” हा त्यांच्या प्रबंधाचा विषय असून, त्यांना डॉ. अमित कुमार अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे यश मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, अध्यक्ष भूषण मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी, प्रा. वसंत चव्हाण, डॉ. डी. एच. थोरात, टी. बी. गिरवलकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. आय. खडकभावी, बिराजदार सर, राजमाने सर, डॉ. संतोष तरके, तसेच सर्व प्राध्यापकवृंद, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!