ताज्या घडामोडी
*ग्राहक तथा ठेवीदारांचा विश्वास व सहकार्य हाच पतसंस्थेचा मूलभूत पाया – माणिक वडवणकर* *श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 8% लाभांश जाहीर* *पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- पतसंस्थेचे ग्राहक तसेच ठेविदांचा विश्वास आणी सहकार्य हाच पतसंस्थेचा मूलभूत पाया असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी व्यक्त केले.ते मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहात आयोजित श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या ३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. मागील ३५ वर्षापूर्वी अतिशय अल्प गुंतवणूकीतून सुरू केलेली श्री योगेश्वरी नागरी सह पतसंस्था आज एका मिनी बँकेच्या स्वरूपात डामडोलात यशस्वी पणे कार्यरत आहे . संस्थापक अध्यक्ष , मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांच्या कार्यकुशल मार्गदर्शनाखाली गेल्या ३५ वर्षापासून श्री योगेश्वरी पतसंस्था ग्राहकाना सेवा उपलब्ध करून देत आहे. याच पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी, अध्यक्ष माणिक वडवणकर यांच्यासह उपाध्यक्ष मनोज लखेरा , संचालक कचरूलाल सारडा , ब्रम्हचारी इंगळे , सुनिल वाघाळकर , रूपेश चव्हाण , शेख अब्दुल करीम,शिरीष भावठाणकर , सय्यद अमजद,ऍड दयानंद लोंढाळ, जावेद गवळी तसेच संचालिका कल्याणी देशपांडे आणि जयश्री घाडगे उपस्थित होते . श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुरुवात श्री योगेश्वरी देवीच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली .पतसंस्थेचे सचिव गजानन कुलकर्णी यांनी मागील वर्षीच्या सभेचे इतिवृत्त आणि आजच्या सभेत चर्चेसाठी येणारे विषययांचे अवलोकन केले . सन २०२४-२५ चा वार्षीक अहवाल पतसंस्थेचे अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी सादर केला. संस्थेचा अहवाल सादर करताना विना सहकार नही उद्धार या ब्रीदवर चालणारी आपल्या विश्वासाची पतसंस्था म्हणजेच श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था होय अशी भावना त्यांनी व्यक्त केली . आज ठेवीदार तसेच ग्राहकांच्या सहकार्याने पतसंस्थेस ३६ वर्षे पूर्ण होत असून संस्थेचा अहवाल सादर करताना अत्यानंद होत असल्याचे माणिक वडवणकर यांनी सांगितले . योगेश्वरी पतसंस्थेने आजपर्यंत अनेक गरजवंताला यामध्ये मुख्यतः फिरते व्यापारी , छोटे व्यापारी , वैयक्तिक कर्ज , घर बांधणी कर्ज तसेच शैक्षणिक कर्ज आणि वाहन कर्ज वाटप केले आहेत. यामुळे शेकडो नागरिकांचे कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य आज स्थिरावले असल्याचे देखील अहवाल सादर करताना अध्यक्ष वडवणकर यांनी अभिमानाने नमूद केले. पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीमध्ये ३१ मार्च २०२५ अखेर पतसंस्थेच्या सभासदांची संख्या २२५१ एवढी असून संस्थेचे भाग भांडवल हे २ कोटी ५३ लाख रुपये असल्याचे स्पष्ट केले. ३१ मार्च २०२५ अखेर पतसंस्थेकडे ५२ कोटी ३५ लाखांच्या ठेवीमधून कर्जवाटप हे ४४ कोटी ६७ लाख रुपये एवढे केले असून अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेत २५ कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे वडवणकर यांनी उपस्थित ग्राहक तथा सभासदांना अवगत केले . त्याचबरोबर दिनांक ३१ मार्च २०२५ अखेर पतसंस्थेस रुपये ८५ लाख २१ हजार रुपये इतका नफा झाला असल्याने ग्राहकांना ८% लाभांश देण्याचे देखील याप्रसंगी जाहीर केले. संस्थेचे वार्षिक लेखा परीक्षण होऊन संस्थेला "ब" वर्ग देण्यात आला असल्याचे सांगत अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी आजमितीला पतसंस्थेच्या कार्यालयात ११ कर्मचारी आणि ०६ नित्य निधी ठेव प्रतिनिधी काम करत असल्याचे देखील सांगितले . शेवटी अध्यक्ष माणिक वडवणकर यांनी संस्थेचे संस्थापक, मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले . पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न करण्यासाठी संस्थेचे कर्मचारी , नित्यनिधी ठेव प्रतिनिधी यांनी मेहनत घेतली. या वार्षिक सर्वसाधारण सभेचे संचलन प्रा अनंत कांबळे यांनी केले तर सभेच्या शेवटी संचालक शिरिष भावठाणकर यांनी उपस्थित सर्व सभासद , ग्राहक आणि हितचिंतक यांचे आभार व्यक्त केले .




