ताज्या घडामोडी

अंबाजोगाईत नगरपालिकेचे अधिकारी बेभरवशाचे; शासकीय यंत्रणा खासगी घरांच्या सेवेत!

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : अंबाजोगाई नगरपालिकेच्या मनमानी कारभारामुळे शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मध्यवर्ती भागातील एका खासगी घराच्या भिंतीत वडाचे झाड आल्याने ती भिंत कोसळली. भिंतीचा मोठा भाग रस्त्यावर कोसळल्याने नाल्यात दगड-माती साचून नाला बुजला आणि त्याचे पाणी रस्त्यावर आले. ही परिस्थिती हाताळण्यासाठी नगरपालिकेच्या जेसीबी व ट्रॅक्टरची मदत घेऊन रस्त्यावर पडलेले मटेरियल उचलण्यात आले. मात्र हे मटेरियल नगरपालिकेची अधिकृत १७ नंबरची जागा रिकामी असताना तीथे टाकण्याऐवजी नगरपालिकेच्या वाहनाने खासगी मालकीच्या जागेत टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे नागरिकांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खासगी घराची भिंत पडल्याने आलेले मटेरियल नगरपालिकेने उचलून का नेले? हे काम घरमालकाच्या खर्चातून व्हायला हवे असताना नगरपालिकेची मशिनरी व ट्रॅक्टर यासाठी वापरण्यात आल्याने या खर्चाचे बिल शेवटी नगरपालिकेवरच चढणार का, अशी शंका व्यक्त होत आहे. नगरपालिकेने हे काम नागरिकांच्या तक्रारीवरून केले की घरमालकासोबत हातमिळवणी करून प्रायव्हेट कामाला शासकीय संसाधने लावली, हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. यामागील सत्यता नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!