ताज्या घडामोडी

गोविंद कसबे यांची ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्षपदी निवड

अंबाजोगाई : ऑल इंडिया पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाई केदार यांनी गोविंद कसबे यांची अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. संघटनेच्या लेटरपॅड वर ही नियुक्ती जाहीर करताना त्यांनी कसबे यांच्याकडून तालुका व परिसरातील जनतेची सेवा तसेच संघटना अधिक बळकट करण्याची अपेक्षा व्यक्त केली. दीपक भाई केदार यांनी सांगितले की, आगामी काळात अंबाजोगाई तालुक्यातील दिव्यांग बांधवांवर शासकीय कार्यालये व इतर ठिकाणी अन्याय अथवा अत्याचार झाल्यास त्याविरोधात आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कसबे प्रयत्नशील राहतील. तसेच दिव्यांगांसाठी शासकीय योजनांचा लाभ खऱ्या हक्कदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते कार्यरत राहतील. गोविंद कसबे यांनी यापूर्वीही दिव्यांग व वयोवृद्धांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिला आहे. कोणत्याही संघटनेचे पाठबळ नसतानाही आपल्या विचारधारेच्या बळावर त्यांनी शासकीय दवाखाने, कार्यालये व इतर ठिकाणी होणारी हेळसांड थांबवून हजारो गरजूंपर्यंत न्याय पोहोचवला आहे. त्यांच्या याच कामगिरीचा गौरव करून त्यांना अंबाजोगाई तालुका कार्याध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे दीपक भाई केदार यांनी स्पष्ट केले. या निवडीबद्दल विविध स्तरांतून गोविंद कसबे यांचे अभिनंदन होत आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!