आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंबाजोगाईच्या योगेश्वरी पॉलिटेक्निकचा अभिनव उपक्रम, निकालापूर्वीच विद्यार्थी कंपनीत रुजू

तंत्रशिक्षणात महाराष्ट्रात अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या कृष्णाजी पुरुषोत्तम चौसाळकर योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील विद्यार्थ्यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पॉलिटेक्निक मधील 40 विद्यार्थी तृतीय वर्षाचा निकाल लागण्यापूर्वीच, नगर येथील नामांकित M-INDIA व नाशिक येथील बॉश कंपनीत रुजू होणार आहेत. योगेश्वरी पॉलिटेक्निक मधील तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील शेवटचा पेपर दिनांक 30 मे 2025 रोजी दिला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या महिन्यापासून म्हणजे 1 जून 2025 पासून, हे विद्यार्थी या कंपनीमध्ये रुजू होणार आहेत. निवड झालेले विद्यार्थी हे मराठवाड्यातील ग्रामीण भागातील गरीब,होतकरू व मजुरी व्यवसाय करणाऱ्या पालकांचे विद्यार्थी असून, त्यांना महाविद्यालयातूनच कॅम्पस मुलाखतीतून नोकरी लागल्यामुळे अल्पावधीतच विद्यार्थी कुटुंबाचा आधार बनले आहेत. ही संस्थेच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची आहे. या यशाबद्दल कंपनीमध्ये रुजू होणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री .चंद्रशेखर बर्दापूरकर, सचिव श्री कमलाकरराव चौसाळकर, योगेश्वरी पॉलिटेक्निकचे प्राचार्य रमण देशपांडे व कंपनीचे प्रतिनिधी श्री अर्जुन कुमार, विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती . महाविद्यालयाच्या निकालाची परंपरा व गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी संस्थेतील सर्व प्राध्यापक व कर्मचारी सतत प्रयत्नशिल असतात.विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी शैक्षणिक संकुलासोबतच, सर्व सोयीयुक्त वसतिगृहे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामागे प्रथम वर्ष विभागप्रमुख प्रा.नारायण सिरसाट, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.रोहित कदम, संगणक विभागप्रमुख प्रा.अतुल फड, यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख व प्लेसमेंट सेलचे प्रमुख प्रा.श्याम गडदे, स्वयंचलित अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.बप्पासाहेब सोनवणे, आदीसह इतर प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींचे परिश्रम आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षित होता यावे, या उद्देशाने सुरू केलेल्या या शैक्षणिक सुविधेचा मराठवाड्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी लाभ घेत असून, चालू शैक्षणिक वर्षात देखील विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.. योगेश्वरी पॉलिटेक्निक हे महाराष्ट्रातील नामांकित तंत्रनिकेतन असून, संस्थेच्या या कार्याबद्दल यापूर्वी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने उत्कृष्ट नामांकन देऊन देखील या पॉलीटेक्निकचा गौरव केला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी महाविद्यालयास मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केलेल्या शैक्षणिक योगदानाबाबत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे “विशेष प्रशस्तीपत्र” देऊन गौरविण्यात आले आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!